मराठी :अनंत मालिका :मातृत्वाची महती भाग ३रा

|| श्री गणेशाय नमः||
ओंकार
ओंकार हे संपूर्ण विश्वाचे मूळ आणि ब्रह्मांडाचा आदिनाद आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ओंकाराच्या स्मरणाने केल्यास मन शांत होते आणि प्रत्येक कार्यात सकारात्मक ऊर्जा व यश प्राप्त होते. 

स्वस्तिक
स्वस्तिक हे मंगलमयता, समृद्धी आणि कल्याणाचे पवित्र प्रतीक आहे. चारही दिशांनी सुख, शांती आणि सौभाग्य नांदावे, हीच मंगलकामना या पवित्र चिन्हातून व्यक्त होते.

कलश
       पूर्ण भरलेला कलश हा जीवन, समृद्धी आणि निर्मितीच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यावरील आंब्याची पाने आणि नारळ हे निसर्गाशी असलेले आपले अतूट नाते आणि मांगल्याची साक्ष देतात.
अनंतमालिका 
'अनंतमालिका' हे केवळ एक नाव नसून ज्ञानाचा आणि विचारांचा अखंड प्रवाह आहे. अद्वितीय, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्म या सात विभागांतून आम्ही तुमच्यापर्यंत  दर्जेदार माहिती पोहोचवणार आहोत. 
अशीच एक दर्जेदार कथा आहे :-

मातृत्वाची महती:
आईचे प्रेम हे या सृष्टीतील सर्वात निस्वार्थी आणि अथांग शक्तीचे रूप आहे. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती स्वतःच्या सुखाचा त्याग करून संस्कारांची जडणघडण घडवत असते.

सकाळचं कोवळं ऊन अंगणात पडलंय. पार्वतीबाई विहिरीवरून रहाटाने पाणी ओढत आहेत, तर बाजूच्या पाळण्यात छोटा बालाजी खेळत आहे.
पार्वतीबाई: (रहाट ओढता ओढता मायेनं पाळण्याकडं बघत)"खेळ रं माझ्या सोन्या, निवांत खेळ... तुझ्या मायची ही घामाची धार तुझ्या उद्याच्या भाग्याचं सोनंच करील रं लेकरा!"



सकाळच्या प्रहरी घरात पार्वतीबाई जात्यावर धान्य दळत आहेत आणि त्यांच्या पाठीशी छोटा बालाजी प्रेमळपणे उभा राहून आईला बिलगला आहे.
पार्वतीबाई: (ओवी गुणगुणत व जात्याचा खुंटा फिरवत)
"पहिली माझी ओवी, पहिल्या नेमाने,जात्यावर दळिते, विठ्ठलाच्या नामे!" 🪔

"दळिता कांडिता, तुज गाईन अनंता,
माझ्या बाळाच्या कपाळी, यश लिही रे भगवंता!" 🌿

"जात्याच्या घरघरी, पडे पिठाची रास, 🌾🎋🌾
कष्टाच्या घामातून, घडे बाळाचा विकास!"

"उजळू दे भाग्य तुझे, होऊ दे मोठा ज्ञानी,
आईच्या या ओव्यांची, सदा राहो गोड वाणी!" 🪷
पार्वतीबाई: (बालाजीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत) "बालू, तुज्यापायीच तर ह्यो समदा राब राब राबणं चाल्लंया नव... तू लय मोठा हो... लय नामचीन... अन तुझा डंका साता समिंदरा पल्याड गाजो, एवढंच या तुज्या मायचं सपान हाय रं! "
श्रीकांतजी: (भावुक होत) "सर्वज्ञ, पहा ना... पहाटेच्या गारव्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ही माऊली स्वतःच्या सुखाचा तिळमात्र विचार न करता आपल्या लेकरासाठी कशी अहोरात्र राबतेय! विहिरीवरचं ते रहाटगाडगे ओढणं असो की जात्यावर दळताना ओव्यांतून बाळावर संस्कार करणं असो, आईची ही माया खरंच शब्दातीत आहे."
सर्वज्ञ: "अगदी बरोबर श्रीकांतजी! तिचा हा आवेश म्हणजे बाळाच्या उज्ज्वल भवितव्याची ग्वाही आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त आपल्या लेकराच्या प्रगतीचं स्वप्न पाहणारी ही माऊली खरोखरच अद्वितीय आहे!"

चिखलात उमलूनही ज्याप्रमाणे सुवर्ण कमळ आपले तेज आणि पावित्र्य जपते, त्याप्रमाणे कष्टांच्या वाटेवरून चालत मातृत्वाच्या संस्काराने घडलेले जीवनही यशाच्या शिखरावर सुवर्णाप्रमाणे झळाळणार हीच नियती आहे. पार्वतीबाईंच्या या अखंड कष्टातूनच बालाजीच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी होत होती.
मित्रांनो, मला कल्पना आहे मी शब्द पाळताना माझी तारांबळ होते. पण माझं वय आहे ७३... तरी देखील तुमच्याशी संवाद साधावा या आंतरिक इच्छेनेच ... याचसाठी करतो आहोत अट्टाहास ! आणि म्हणूनच पुढचा भाग घेऊन येत आहोत नक्की या रविवारी याची खात्री बाळगा. धन्यवाद |

Comments

Popular posts from this blog

संवाद क्रमांक १: अनंतमालिका

नतमस्तक श्रीकांत जी आणि ए आय सर्वज्ञ... सर्व रसिकांस आमचे विनम्र निवेदन ...